यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील परसाडे येथे ग्रामपंचायतीच्या आवारात तसेच गावात ठिकठिकाणी आज (दि.७) ‘झाडे लावा झाडे जगवा’ या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सामाजीक वनीकरण विभागाकडून येथील ग्रामपंचायतीस विविध जातींची ५०० झाडे प्राप्त झाली आहेत.
परसाडे येथील आदर्श व ग्राम स्वच्छता अभियानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ग्रामसेवक मजीत अरमान तडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ग्रामपंचायतीच्या आवारात गावातील जेष्ठ महिला जनाबाई दगडु पाटील आणि विमलबाई श्रावण सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक मजीत अरमान तडवी, माजी सरपंच हुसेन तडवी, जाबीर तडवी, रोशन तडवी, दिपक पाटील, रमजान तडवी, पंकज रवीन्द्र पाटील उपस्थित होते. गावातील जिल्हा परिषद शाळा, कब्रस्तान, स्मशानभुमी यासह विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे.