यावल येथे जलशुद्धीकरण व पाणी वितरणासाठी ट्रांसफार्मर बसविण्यास सुरूवात

यावल प्रतिनिधी । शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील नविन वसाहतीमध्ये सुमारे २ कोटीच्या निधी खर्चातुन नवीन जलकुंभ (पाण्याच्या टाकी) वरून नवीन विस्तारित भागात पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टर) व साठवण तलाव येथे उच्च क्षमतेचे २०० केव्हिएचे ट्रांसफार्मर बसविण्याचे काम सुरू झाले आहे.

सदर कामाची यावल नगर परिषदच्या तत्कालीन नगराध्यक्ष नौशाद तडवी, भारतीय जनता पार्टीचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, सामाजीक कार्यकर्ते मुबारक तडवी, भूषण फेगडे, रितेश बारी, सागर लोखंडे, अक्षय करांडे आदिंनी पाहणी केली आहे.

सदरच्या कामास महावितरणाच्या सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांचेकडून तांत्रिक मान्यता मिळालेली असून,  जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगाव यांचेकडून वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत रक्कम रुपये २६ लाख ९६ हजार १९५/- चे अंदाजपत्रकीय खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

येत्या ८ ते १० दिवसात नवीन विस्तारित भागातील भोईटे नगर, पुर्णवाद नगर, हरीओम नगर, लोकेशनगर, विरार नगर, गणेश कॉलनी, पांडुरंग नगर, गंगा नगर, चाँदनगर, आयशा नगर, फालक नगर अशा सुमारे २८ कॉलनीच्या वसाहतीत मधील नागरीकांना स्वच्छ व मुबलक सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळेस यावल महावितरण चे अभियंता दिलीप मराठे व यावल नगर परिषदचे विद्युत अभीयंता पंकज पांडे हे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होते.

 

Protected Content