यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आजपासून ऑनलाईन शेतकऱ्यांचे नाव नोंदणी करून हरबरा खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांची हरबरा खरेदी केंद्राची सुरूवात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राकेश वसंत फेगडे, माजी सभापती नारायण शशीकांत चौधरी, माजी उपसभापती व संचालक तुषार सांडुसिंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुंजो डिंगबर पाटील, सुनिल वासुदेव बारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मार्केटींगचे डी.एम.ओ. परीमल साळुंखे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस.बी. सोनवणेंसह इतर कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राकेश फेगडे यांनी पत्रकारांशी बोलतांना हरबरा खरेदीस शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून आजपर्यंत तालुक्यातील १५५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नांव नोंदणी केल्याची माहीती दिली.