यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भविष्यातील येणाऱ्या काळातील इंधनाचा तुटवडा लक्षात घेता आपण आता पर्यायी मार्गाकडे जाणार असुन, केन्द्र आणि राज्य शासनाच्या वतीने इंधनाची पर्यायी व्यवस्था म्हणुन बायोडिझल इतर विद्युत उपकरणावर चालणारी वाहने निर्माण करण्यासाठी वळले असून येणाऱ्या काळातील इंधन समस्येबाबत आपण सर्वांनी जागृत राहावे असे आवाहन यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी येथील एसटी आगाराच्या वतीने इंधन बचत सप्ताहाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.
यावल एसटी आगाराच्या परिसरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरिक्षक राकेश मनगावकर हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. के. आर. दुसाने, सहाय्यक फौजदार असलम खान यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित इंधन बचत सप्ताहाची सुरुवात पोलीस निरिक्षक मानगावकर यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आली.
याप्रसंगी प्रा. के. आर. दुसाने उपस्थितांनी केले आगारातील, आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी उपस्थितांना इंधन बचत संदर्भात मार्गदर्शन केले .यावेळी ईंधन बचती मध्ये चांगली कामगिरी करणारे वाहनचालक वाय. एस. तडवी, पि. बी. जाधव, बि. एम. सपकाळे, व्हि. बि. सोळुंके, एस. टी. सोनवणे, आय. एन. तडवी व आगारातील कर्मचाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार किशोर मंदवाडे यांनी केली.