अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात ११ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतू अद्यापपर्यंत अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले नाही त्यामुळे अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणीचे निवेदन राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच अमळनेर तालुक्यात कापूस उत्पादकमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु अमळनेर तालुक्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात कापसाचे भाव सीसीआयच्या भावापेक्षा ५०० ते १ हजार रुपयांनी कमी आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यात ११ कापूस खरेदी केंद्र सुरू आहे, मात्र अमळनेर तालुक्यात अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे, दरम्यान शासनाने अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र त्वरीत स्वरूप करावे. अशी मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमीटीच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केले आहे.
याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांच्यासह दिनेश पाटील, दिनेश पवार, त्रंबक पाटील, विठ्ठल पवार, प्रतापराव पाटील, भानुदास पाटील, अशोक पाटील, सुरेश पाटील, शिवाजी पाटील, शरद पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.