भुसावळ प्रतिनिधी । भोजन करतांना चित्रपटाचा आनंद घेण्याची अनोखी सुविधा प्रदान करणारे स्टार सिनेमा हे चित्रपटगृह आजपासून सुरू होत असून विशेष म्हणजे राज्यातील हे या प्रकारातील पहिलेच चित्रपटगृह आहे.
भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मोतीराम चौधरी यांच्या हिमालय ग्रुपची मालकी असणार्या स्टार रिसॉर्टच्या परिसरात आज स्टार सिनेमा या चित्रपटगृहाचे उदघाटन होत आहे. इग्लूप्रमाणे डोमच्या आकाराचा हा सिनेमा हॉल पुर्णपणे वातानुकुलीत आहे. के सेरा सेरा आणि छोटू महाराज या ख्यातप्राप्त कंपन्यांच्या सहकार्याने हे चित्रपटगृह सुरू करण्यात आले आहे. यात कर्व्ह म्हणजेच वक्राकार आकारमानाचा फोर-डी लेझर स्क्रीन दिलेला असून यावरून अतिशय उच्च दर्जाच्या व्हिज्युअल्सची अनुभूती घेता येणार आहे. याला ७.१ डॉल्बी डिजीटल ध्वनी तंत्रज्ञानाची जोड दिलेली असल्यामुळे अत्युच्च ध्वनीचा मिलाफ यात झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे चित्रपट पाहतांना कुणीही स्नॅक्सच नव्हे तर यासोबत मेन कोर्सचे जेवणसुध्दा करू शकणार आहे. म्हणजे हे डायनिंग हॉलयुक्त चित्रपटगृह आहे. राज्यात अशा प्रकारचे हे पहिलेच चित्रपट गृह असून याचा जिल्ह्यातील जनतेचे लाभ घ्यावा असे आवाहन हिमालय ग्रुपचे प्रमुख विजय मोतीराम चौधरी यांनी केले आहे.
स्टार सिनेमामध्ये सर्व स्नॅक्ससह सेव्हन कोर्सचे मेन्यू उपलब्ध आहेत. २६ जुलैपासून जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या माध्यमातून हे चित्रपटगृह सर्व जनतेसाठी खुले होत आहे. या चित्रपटगृहाची तिकिटे ही बुक माय शो आणि पेटीएमवर उपलब्ध आहेत. तर टेली बुकींगसाठी ०२५८२-२४३३८३ व ८३९०३७४८०९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
पहा : गुगल मॅप्सवर स्टार सिनेमाचे अचूक लोकेशन.
पहा : स्टार सिनेमाची माहिती देणारा व्हिडीओ.