यावल प्रतिनिधी । शहरातील बाबूजी पुरा परिसरात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलावर दारूच्या नशेत एकाने पैसे हिसकवण्याच्या प्रयत्नात असतांना चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना काल मंगळवारी १० ऑगस्ट रोजी पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. यात हल्लेखोरास जमावाने पकडून चांगलाच चोप दिला व यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बाबूजीपूरा खाटीक वाडा भागात काल मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास सय्यद तलाह अब्दुल अव्वल (वय १२) हा अल्पवयीन मुलगा किराणा सामान आणण्यासाठी पाचशे रूपयाची नोट घेवुन जात होता. दरम्यान याच भागातील रहिवासी असलेला आरिफ रशीद खाटीक ( वय ३८) दारूच्या नशेत सय्यद तलाह यांच्या समोर येवून त्यांच्या हातातील पाचशेची नोट हिसकावण्याचा प्रयत्न केला. पैसे देण्याचा विरोध केला असता आरिफ खाटीक यांने मुलावर पाठीवर चाकूने हल्ला चढवला. यात मुलगा जखमी झाला. ही घटना घडताच परिसरातील नागरीकांनी संशयित आरीफ खाटीक याला पकडून बेदम चोप दिला व पोलीसांच्या ताब्यात दिले.जखमी झालेल्या सय्य तलहा याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी मुलाचे वडील अब्दुल अव्वल अब्दुल नबी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरीफ रशीद खाटीक याच्या विरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.