मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र एसटी कामगार सेना संचलित सेना ऍक्शन टीम द्वारे एसटी महामंडळातील कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महाराष्ट्राचा सुपर गायक ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेत धुळे विभागातील शिंदखेडा आगाराचे वाहक मनोज बाविस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विजेत्यांचा सत्कार शिवसेना उपनेते खा. अरविंद सावंत यांच्या हस्ते दादर येथील सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेची सुरुवात दिनांक 1 जुलै 2021 रोजी करण्यात आली व 31 जुलै 2021 पर्यंत व्हिडिओ मागविण्यात आले. या स्पर्धे अंतर्गत जवळपास 750 व्हिडिओज संकलित झालेत. त्यापैकी निवड करून 400 व्हिडिओज ला प्रसारित करण्यात आले. तदनंतर आलेल्या सर्व गाण्यांमधून सर्वोत्कृष्ट वीस गाण्यांना निवडण्यात आले. या वीस गाण्यांचे परीक्षण करून त्यातून सर्वोत्कृष्ट दहा गाण्यांची निवड करण्यात आली. आणि यातून एक ते पाच प्रमाणे सर्वोत्कृष्ट गायकांची निवड करण्यात आलेली आहे. प्रथम क्रमांकावरील मनोज बाविस्कर, एसटी वाहक (धुळे विभाग) गायकास 7001/- रुपये व त्यासोबत सन्मानपत्र देखील देण्यात आले. तसेच अमर जासुतकर (वर्धा विभाग) यांना 5001/- द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तृतीय क्रमांकाचे 3001/- बक्षीस शीतल काकडे (लातूर विभाग) यांना प्रदान करण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे 2001/- बक्षीस अंजली गायकवाड (सातारा विभाग) यांना तर पंचम क्रमांकाचे 1001/- रुपयांचे बक्षीस सुभाष पगारे (नाशिक विभाग) यांना मिळाले.
महाराष्ट्राचा सुपर गायक 2021
एसटी महामंडळातील ऑनलाईन गीतगायन स्पर्धा विजेते :-
1) मनोज बाविस्कर, धुळे विभाग
7001/- प्रकाश अवस्थी (सोलापूर विभाग) यांचेकडून..
2) अमर जसुतकर, वर्धा विभाग
5001/- किरण बिडवे ( अ. नगर विभाग) यांचेकडून..
3) शीतल काकडे, चंद्रपूर विभाग
3001/- व्यंकटराव बिरादार (लातूर विभाग) यांचेकडून..
4) अंजली गायकवाड, सातारा विभाग
2001/- गजानन माने (बुलढाणा विभाग) यांचेकडून..
5) सुभाष पगारे, नाशिक विभाग
1001/- सौ. स्मिता पत्की (मुंबई विभाग) यांचेकडून..
6) उत्तेजनार्थ सन्मानपत्र
शेखर उईके (चंद्रपूर विभाग) यांचेकडून..
स्पर्धेतील इतर उत्कृष्ट गायक :-
संतोष वरुडे, सांगली विभाग
अजिंक्य भवर, बुलढाणा विभाग
राजेश सोनोने, अमरावती विभाग
राजू पाटील, जळगाव विभाग
संदेश नारंजे, वर्धा विभाग
जया झास्कर, पुणे विभाग
निलेश निंबाळकर, कोल्हापूर विभाग
संदीप सावंत, सिंधुदुर्ग विभाग
हिम्मत राठोड, जळगांव विभाग
अरुण जाधव, सांगली विभाग
सानिका जोशी, सांगली विभाग
जागृती पेंढारकर, जळगांव विभाग
आनंद जहांगीरदार, अकोला विभाग
नितीन शेवाळकर, परभणी विभाग
गजानन जवळकर, अकोला विभाग
सुधीर गवस, सिंधुदुर्ग विभाग
उन्नती चापोळीकर, नांदेड विभाग
सपना सावंत, कोल्हापूर विभाग
संकेत बाभळे, वर्धा विभाग
वरील गायकांना सर्वोत्कृष्ट गायनाचे सन्मानपत्र देण्यात आले.
या महत्वपूर्ण स्पर्धेच्या परीक्षणाचे कार्य सर्वश्री प्रा. संजय पाटील, पवन मेढे, भुपेंद्र मराठे, विश्वास चौधरी, कांतीलाल पाटील, रीना बडगुजर, आरती धाडी व शुभम पाटील यांनी पाहिले.