भुसावळ (प्रतिनिधी) येथील नाहाटा चौफुलीवर लोकसभा निवडणूकीच्या कामकाजासाठी नेमलेल्या एस.एस.टी. पथकाला वाहन तपासणी दरम्यान ट्रक मधून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे आढळले असून ट्रक जप्त करण्यात आला आहे.
एस.एस.टी. पथकातील अधिकारी सुदाम नगरे सोबत पो. कॉ. अक्षय चव्हाण असे नाहाटा चौफुलीवर नाकाबंदी करीत असतांना (एम.एच. १८ एएम ४८१४) या ट्रकमधून अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पथकाला आढळून आले. यावेळी चालकाकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशावरून वाहन पकडून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.