Home क्रीडा एसएसबीटीच्या खेळाडूंना मिनी गोल्फ स्पर्धेत कांस्य पदक

एसएसबीटीच्या खेळाडूंना मिनी गोल्फ स्पर्धेत कांस्य पदक

0
26

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ  स्पर्धेत विद्यापीठ संघ आणि एसएसबीटी खेळाडूंनी कांस्य पदक प्राप्त केले आहे.

जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ  स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या संघातील खेळाडू व  एसएसबीटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बिसीए  विभागातील तृतीय वर्षाचे  विद्यार्थी तनुश्री फुलझाडे हिस महिला संघात कांस्यपदक ( मिनी गोल्फ)  व सुमित संतोष पाटील (मिनी गोल्फ) यास पुरुष डबल विभागात कांस्य पदक  प्राप्त झाले.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. पाटील,  क्रीडा संचालक प्रा. जे. बी. सिसोदिया, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे या यशाबद्दल अभिनंदन केले. या खेळाडूना क्रीडा संचालक प्रा. जे. बी. सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

 


Protected Content

Play sound