भुसावळ प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत असून यात एसआरपीएफ जवानांना पुन्हा या विषाणूची बाधा झाल्याचे दिसून आले आहे.
भुसावळ शहरातील संसर्ग मध्यंतरी बर्यापैकी आटोक्यात आला होता. तथापि, आता पुन्हा एकदा याचे रूग्ण वाढीस लागल्याचे अधोरेखीत झाले आहे. यात रविवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यातील २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात राज्य राखीव दल म्हणजे एसआरपीएफ तुकडीतील आठ जवानांचा समावेश आहे. सध्या एसआरपीएफ जवान बंदोबस्तासाठी भुसावळात आलेले असून त्यांनाच कोरोनाची लागण झालेली आहे. या आधी देखील एसआरपीएफ जवानांना कोरोनाने ग्रासले होते. तथापि, या जवानांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. यानंतर पुन्हा एकदा एसआरपीएफ जवान या विषाणूने बाधीत झाले आहेत. आता त्यांच्या सहकार्यांचीचही चाचणी करण्यात आली आहे.