वरणगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरणगाव शिवसेनेने संसर्गजन्य रोगाचे निर्मुलन करण्यासाठी ५० हजार लोकसंख्या असलेल्या या वरणगावात फवारणी सप्ताह कार्यक्रम हाती घेतला आहे.
वरणगाव शहरामध्ये डेंगू ,मलेरिया, टायफड ,या आजाराने थैमान घातले आहे, यासाठीच या आजारांपासून नागरिकांचा बचाव व्हावा ,यासाठी वरणगाव शिवसेनेच्यावतीने पूर्ण सप्ताभर प्रत्येक वार्डा मध्ये व गल्लीबोळ यामध्ये फिरून फवारणी करण्यात येणार आहे ,अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/521059132293189