जळगाव,प्रतिनिधी । शिवाजीनगर प्रभागामध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला असून धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेेचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण करतांना फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना या परिसरात डेंग्यू रुग्ण आढळून आल्याने त्यांनी आरोग्य विभागाला संपूर्ण परिसरात धूर फवारणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवाजीनगर प्रभागामध्ये सर्वेक्षण करतांना धर्मरथ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना भुरे मामलेदार प्लॉट व काळे नगर परिसरात डेंग्यूचे रुग्ण सुद्धा आढळून आले. या पार्श्वभूमीवर फाउंडेशनच्या वतीने आरोग्य विभागास येथील संपूर्ण परिसरात धूर फवारणी करून याकामी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने योग्य त्या उपाययोजना करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे. तसेच लवकरात लवकर शिवाजी नगर भागात डेंग्यू व मलेरियाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर धूर व औषध फवारणी करून निर्जंतुक करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतांना धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील आणि प्रकाश मुळीक हे उपस्थित होते.