अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या दहाव्या वार्षिक क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्षा ड.लालिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटिल, संजय चौधरी, तालुका क्रीडा संघाचे अध्यक्ष एस पी वाघ सर, संस्थेचे संचालक पराग पाटील, प्राचार्य निरज चव्हाण आणि प्रा.प्रकाश महाजन यावेळी उपस्थित होते.
सरस्वती पूजन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रिडा मशालीचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशांत सरोदे यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात येवून स्पोर्ट कॅप्टन ला सुपूर्द करत क्रिडा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानंतर रंगारंग नृत्यातून विविध क्रीडा क्षेत्रातील सुवर्ण पदक मिळवलेल्या खेळाडूंच्या वेशभूषेत सादर केलेल्या नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
दहाव्या वार्षिक क्रिडा महोत्सवाचे प्रास्ताविक व वार्षिक आढावा प्राचार्य नीरज चव्हाण यांनी मांडत आतापर्यंतचा क्रिडा प्रवास व मिळवलेल्या उल्लेखनीय यशाविषयी अभिमान व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशांत सरोदे यांनी विद्यार्थ्यामध्ये क्रिडा जागरूकता व रुची निर्माण व्हावी, यासाठी क्रिडा महोत्सवासारखे कार्यक्रम महत्वाचे असल्याचे मत व्यक्त करत प्रत्येकाने निदान एक तरी खेळ खेळायला हवा असल्याचा संदेश दिला. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ललिताताई पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व क्रिडा प्रबोधनपर विचार व्यक्त केले.
या महोत्सवाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. तीन दिवसीय आयोजित या क्रिडा महोत्सवात ग्रीन, ब्ल्यू, रेड आणि सफ्रोन हाऊस यांच्यात विविध स्पर्धा होणार आहेत. यात प्रामुख्याने बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुध्दिबळ, १००मीटर, रिले रेस, खो-खो, क्रिकेट, गोळा फेक, यासारख्या इतर ३० खेळांचे स्पर्धा घेण्यात येतील. विद्यार्थी प्रचंड उत्साहाने प्रत्येक खेळात सहभाग नोंदवीत आपल्या संघाला विजयी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्या अश्विनी चौधरी, वरीष्ठ पर्यवेक्षिका जयश्री भोसले, क्रिडा शिक्षक केदार देशमुख, सागर चावरिया यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विलास पाटील व शिक्षिका मुस्कान धींगरे यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक नितेश परब यांनी केले. सहशिक्षक निलेश वानखेडे आणि अतूल भदाने यांनी कार्यक्रमाचे विविध प्रसंग आपल्या कॅमेर्यात बंदिस्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.