एरंडोल येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील कोरोना रुग्णांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून दवाखाने, मेडिकल, दुध डेअरी, बँका, शासकीय निमशासकीय कार्यालये इत्यादी सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र एका कापड दुकानदाराने मागच्या दरवाज्यातून सकाळी काहीवेळ कापड व लग्नाचा बस्ता विक्री केल्याची जोरदार चर्चा आहे.

मेन रोड च्या मुख्य बाजापेठेत दवाखाने, मेडिकल व दुध डेअरी, बँक, शासकीय निमशासकीय कार्यालये या सेवा सुरु होत्या. मात्र इतर दुकाने बंद आढळून आली. फुले आंबेडकर व्यापारी संकुल, म्हसावद नाक्यावरील व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, शेतकी संघ व्यापारी संकुल याठिकाणी शुकशुकाट आढळून आला.दरम्यान बुधवार दरवाजा जवळ नागरिकांच्या अँटी जन टेस्ट घेण्यात आल्या.

 

Protected Content