Home उद्योग कल्पनिती दिवाळी एक्झिबिशनला जळगावकर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

कल्पनिती दिवाळी एक्झिबिशनला जळगावकर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘कल्पनिती दिवाळी व लाइफस्टाइल शॉपिंग एक्झिबिशन’ला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः महिलांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, संपूर्ण भारतातून आलेल्या ८० हून अधिक नामांकित स्टॉल्समुळे एकच खरेदीचा जल्लोष पहावयास मिळाला.

लाड वंजारी ए.सी. हॉल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. इद्राणी मिश्रा, ऐश्वर्या रेडी, नयनतारा बाफना आणि डॉ. जुही भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्पनितीच्या संचालिका नीता जैन आणि कल्पना शाह उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन आणि स्वागत विधीनंतर संपूर्ण सभागृहात विविध उत्पादने आणि स्टॉल्स पाहण्यासाठी गर्दी उसळली.

सणासुदीच्या खरेदीला रंगत आणणाऱ्या या प्रदर्शनात साड्या, कुर्तीज, वेस्टर्न वेअर, लखनवी ड्रेस, बेडशीट्स, डिझायनर टेबलमॅट्स, हस्तकला वस्तू, आकर्षक पाऊच, फूटवेअर, दिवे, तोरण, गिफ्ट आयटम्स आणि फॅशनेबल दागिन्यांचे विपुल साठे ठेवण्यात आले आहेत. यामुळे महिलावर्गामध्ये खरेदीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला.

प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे देशभरातील विविध शहरांमधून आलेले स्टॉलधारक. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, सुरत, नागपूर, इंदूर, हैदराबाद, जयपूर अशा शहरांतील नामवंत उत्पादक आणि विक्रेते एकाच छताखाली एकत्र आल्याने ग्राहकांना दर्जेदार व नविन ट्रेंडनुसार खरेदीचा उत्तम पर्याय मिळाला आहे.

दोनच दिवसांच्या या एक्झिबिशनचा आज ५ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असून, पहिल्याच दिवशी झालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आयोजकांनी अधिकाधिक ग्राहकांनी येऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे. प्रदर्शनात एक फूड कोर्ट देखील उभारण्यात आले असून, खरेदीसोबत खाद्यपदार्थांचाही आनंद घेण्याची सुविधा ग्राहकांसाठी आहे.

संपूर्ण जळगाव शहरात दिवाळीपूर्वी खरेदीचा उत्साह वाढवणाऱ्या या प्रदर्शनाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः महिलावर्गासाठी उपयुक्त आणि आकर्षक वस्तू उपलब्ध असल्याने सर्व वयोगटातील महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे.


Protected Content

Play sound