जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या कृषिदूतांच्या वतीने देवपिंप्री व माळपिंप्री येथे आयोजित कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शाश्वत व आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शनामुळे मेळाव्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले.
मेळाव्याचे उद्घाटन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (जामनेर) मा. सुभाष अहिरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिता ज्ञानेश्वर पाटील (सरपंच, माळपिंप्री) होत्या. यावेळी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, देवपिंप्रीचे उपसरपंच संजय रमेश पाटील, माळपिंप्रीचे पोलीस पाटील धनंजय रामधन पाटील, मंडळ कृषी अधिकारी (जामनेर) भागवत किसन चिमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. एन. बी. सदार, सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद पाटील, शरद सुरडकर, राहुल बावस्कर, विनय ऍग्रोचे जगदीश पाटील, बापू काळबैले, किरण पाटील, पळसखेडे गावचे उपसरपंच रवी हडप, कंपनी प्रतिनिधी दीपक डोंगरे (प्लांटो), पंकज पाटील (आयडियल), कृषी पदवीधर प्रज्वल देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील व कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीदूत सुशांत शंकर जाधव व श्रीकृष्ण पुंडलिक सोनोने यांनी केले. मेळाव्याची प्रस्तावना प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी मांडली. त्यानंतर कृषीदूत अमन मोगल व कृषीकन्या नेहा बाविस्कर यांनी मेळाव्याच्या विषयांची माहिती शेतकऱ्यांना दिली.
मेळाव्यात प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी. एम. गोणशेटवाड, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. एन. बी. सदार, सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद पाटील, राहुल बावस्कर, दीपक डोंगरे, बाप्पू काका काळबैले, रवी हडप तसेच उद्घाटक सुभाष अहिरे यांनी शाश्वत व समृद्ध शेती, टरबूज लागवड तंत्रज्ञान, उत्पादन वाढीचे उपाय तसेच ‘महाविस्तार’सारख्या आधुनिक उपक्रमांचा शेतीत होणारा उपयोग याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी आभार प्रदर्शन करून मेळाव्याचा समारोप केला.



