Home क्राईम भरधाव ट्रकची बसला धडक; बसचे किरकोळ नुकसान !

भरधाव ट्रकची बसला धडक; बसचे किरकोळ नुकसान !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अहुजा नगर येथील एकविरा हॉटेलजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पुढील बसला जोरदार धडक दिल्याने किरकोळ अपघात झाल्याची घटना बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली. याबाबत रात्री ८ वाजता ट्रकवरील चालकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल अभिमन सपकाळे वय ३९ रा. बांभोरी ता. धरणगाव हे बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता बस क्रमांक (एमएच १४ एमएन २९९०) ने जळगाकडून धुळे रस्त्याने जात असतांना जळगाव शहरातील अहुजा नगर येथील एकविरा हॉटेल जवळून जात असतांना मागून येणारा भरधाव ट्रक क्रमांक (एमएच ४० सीएम ३४०) ने धडक दिली. या धडकेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

या अपघातात बसच्या काचा फोडून नुकसान झाले. याप्रकरणी बस चालक सुनिल सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील चालक विजयकुमार दिनेश साकेत रा. सतना, मध्यप्रदेश याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रविण पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound