Home क्राईम भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; चालकास अटक

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; चालकास अटक


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील राष्‍ट्रीय महामार्गावर पाळधीकडून मुसळीकडे दुचाकीने जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराला चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमोल बाबुलाल पाटील रा. हातनुर ता. भुसावळ असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे अमोल पाटील हे आपल्या कुटुंबिसांसह वास्तव्याला आहे. रविवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास रविंद्र पाटील हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ एआर ५४२४) हे पाळधीकडून मुसळीकडे जात असतांना समोरून येणारा ट्रक (एमपी ०९ जीएच ५००३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अमोल पाटील हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले व जागीच ठार झाले. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागकांनी धाव घेवून ट्रक चालक धमेंद्रसिंह भेरूसिंह रा. दरखेडा ता. जावर जि.सिहोर याला पकडून धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound