Home क्राईम भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक : दोन्ही मित्र बचावले !

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक : दोन्ही मित्र बचावले !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बायपास रोडवर पुन्हा एकदा भरधाव वेगाचा थरार पाहायला मिळाला. पाळधी ते जळगाव दरम्यान असलेल्या आव्हाणे शिवारातील नवीन बायपास पुलाजवळील पेट्रोल पंपाजवळ एका विनावेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मयूर अरुण लहासे (वय २८, रा. साई नगर, जळगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मयूर लहासे हा १ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारासस त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएस ९८०६) ने त्याचा मित्र तुषार वालकर यांच्या सोबत जात होता. जळगाव-पाळधी दरम्यानच्या आव्हाणे शिवारातील पेट्रोल पंपाजवळ समोरून येणारी कार क्रमांक (एमएच ०५ एबी ०२७८) ने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मयूर लहासे आणि तुषार वालकर हे दोन्ही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कारवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound