होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेच्या विशेष गाड्या

Train

 

भुसावळ प्रतिनिधी । होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टी असल्याने रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागणार असल्याची माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे.

पुणे ते दरबंगा या दरम्यानच्या प्रवासात रेल्वे विशेष स्वरूपाच्या गाड्या याप्रमाणे राहणार आहे. 1. जबलपुर-पुणे (01656) विशेष एक्सप्रेस असून दिनांक 11 मार्च ते 10 जून 2016 पर्यंत धावणार आहे. ही गाडी जबलपुर पासून सकाळी 7.45 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 4.05 वाजता पुण्याला पोहचणार आहे. ही गाडी खंडवाला दुपारी 14.43, भुसावळला दुपारी 16.45, मनमाडला सायंकाळी 17.45 असा थांबा राहणार आहे. तर दुसारी रेल्वे 01655 स्पेशल रेल्वे 12 मार्च ते 11 जून 2019 दरम्यान विशेष स्वरूपाची राहणार आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी 07.45 ला सुटणार असून जबलपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता जबलपूर येथे पोहचणार आहे. दरम्यानच्या स्टेशन म्हणजेच मनमाडला दुपारी 15.20, भुसावळ सायंकाळी 5 वाजता, खंडवाला रात्री 8.28 अशी प्रमुख गावांचा थांबा राहणार. दरम्यानच्या जबलपूर, महल, श्रीधाम, नरसिंगपूर, करेली, गाडरवाडा, पिपरिया, इटारसी, हरदा, खिरकिया, छनेर, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, अहमदनगर, दौड आणि पुणे अश्या स्टेशनला थांबा देण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content