धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक विद्यामंदिर धरणगाव शाळेच्या शिक्षकांनी गावातील मोठा माळीवाडा परिसरात शाळाबाह्य मुलांसाठी विशेष शोध मोहीम सुरू केली आहे. धरणगाव तालुका शिक्षण विस्तार अधिकारी बिर्हाडे, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण सुरू केले आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी मार्गदर्शन केले. या सर्वेक्षणात शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवायची आहे. याप्रसंगी सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या शिक्षकांनी शोध मोहिमेला सुरुवात केलेली आहे. मोठा माळीवाडा परिसरातील रामलीला चौक, सावित्रीबाई फुले चौक, महात्मा फुले चौक, मोठा माळीवाडा समाज मढी, कलाल वाडा, बाजोट चौक, फुलहार गल्ली, जांजीबुवा गल्ली ते बालाजी मंदीर या ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे.
महात्मा फुले हायस्कूलच्या जेष्ठ शिक्षीका पी.आर.सोनवणे, एम.के. कापडणे, एम.बी.मोरे, एस.व्ही.आढावे, एस.एन. कोळी, एच.डी. माळी, व्ही.टी.माळी, सी.एम.भोळे, पी.डी. पाटील, व्ही.पी. वऱ्हाडे, एम.जे.महाजन, गोपाल महाजन, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, पवार सर या शिक्षकांकडून मोठा माळीवाडा परिसरात सर्वेक्षण करण्यात येत आहे.