जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ईदगाह ट्रस्टची सर्वसाधारण सभा आज उत्साहात पार पडली असून यात अनेक विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
जळगाव जिल्हा कब्रस्तान व इदगाह संस्था ही वक्फ कायद्यानुसार नोंदणीकृत आहे त्या संस्थेच्या घटनेतील/ योजनेतील उद्देश, नियमावली यात प्रामुख्याने जळगाव शहराची वाढलेली वार्ड संख्या, स्वीकृत सदस्य संख्या, निवडणुकी व सभासदत्व फी बाबतचे नियम तसेच इतर बदला साठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन अध्यक्ष अब्दुल वहाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
घटनेतील/योजनेतील जुने व नवीन स्वरूप,ट्रस्ट ची घटना १९९७ नंतर दुरुस्ती न केल्याने तसेच २०११ ला संस्था वक्फ बोर्डात नोंदणीकृत झाली असताना सुद्धा त्या ठिकाणी घटना/ योजना दिली नसल्याने जुन्या घटनेतील/योजनेतील नियम, उद्देश, वार्ड संख्या व इतर बदल बाबत जनरल सेक्रेटरी फारुख शेख यांनी सभेसमोर ड्राफ्ट ठेवला. त्यात जुने १५ वार्डाचे १९ वार्ड करण्यात आले, स्वीकृत सदस्य ६ वरून २ करण्यात आले. वाढ केलेल्या वार्डात पिंपराळा हुडको, उस्मानिया पार्क, शिवाजीनगर हुडको,सुप्रीम कॉलनी, मेहरुन -सालार नगर या वार्डांचा समावेश करण्यात आला. या सर्व बदलांमध्ये काही दुरुस्ती सह एकमताने मंजुरी देण्यात आली.
यांनी घेतला चर्चेत सहभाग
नगरसेवक रियाज बागवान, एम आय एम जिल्हा अध्यक्ष अहमद सर,माजी अध्यक्ष जिया बागवान, कादरी फाउंडेशनचे फारूक कादरी, अमन फाउंडेशनचे शाहिद सय्यद ,अक्सा फाउंडेशनचे आमिर शेख, मीर शुक्रल्ला फाउंडेशनचे मीर नाजिम अली,शनिपेठ चे आसिफ मिर्झा,महानगर अध्यक्ष दानिश खान,अल्फैज चे मुश्ताक सालार यांनी सूचना नोंदविल्या.
सूचना व दुरुस्तीला अध्यक्ष वहाब मलिक यांनी उत्तर देऊन सभासदाचे समाधान केले
ट्रस्ट तर्फे यांची होती उपस्थिती
अध्यक्ष वहाब मलिक, उपाध्यक्ष मुस्ताक सय्यद, जनरल सेक्रेटरी फारुक शेख, खजिनदार अशपाक बागवान, सहसचिव अनिस शाह व मुकीम शेख, संचालक गुलाब फते मोहम्मद,मझहर खान,ताहेर शेख ,इकबाल बागवान, नजीर मुलतानी, याकुब खाटीक, सादिक सय्यद, स्वीकृत सदस्य कादर कच्ची, अजिज सालार, शरीफ पिंजारी, फारुक बादलीवाला आदींची उपस्थिती होती
सभेची सुरुवात डॉ जावेद शेख यांच्या कुराण पठणाने व समारोप त्यांच्याच दुआ ने करण्यात आला.