जळगाव प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सव, नवरात्री आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार वा पडद्या मागचे गुन्हेगारांवर करडी नजर आहे. नागरीकांना सोशल मीडियावरील अफवांवर बळी न पडता येणारे सण व उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि होणारे गंभीर घटनेतील आरोपी व मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
1. यात शनिवारी फळविक्रेत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील लोकेश विलास उत्तरदे, मोहन इश्वर पाटील, हर्षल धर्मरत्न सोनवणे, विजय गणेश कांडेलकर, राहुल संजय पवार आणि सागर उर्फ दिनेश प्रभाकर दुसाने या सहा जणांना अवघ्या 12 तासांत अटक करण्यात आले.
2. रविवारी धनश्याम दिक्षीत यांचा खून करण्यात आला. एमआयडीसी पोलीसांनी अवघ्या सहा तासांत संशयित आरोपी मोनीसिंग उर्फ अशोक कोळी (वय-25) रा. सबजेलच्या पाठीमागे आणि सानी उर्फ चाळीसग वंसत पाटील (वय-23) रा. रामेश्वर कॉलनी दोघा आरोपींना अटक केली.
3. चोपडा, धरणगाव आणि अमळनेर पोलीसात दाखल असलेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगार प्रविण राणछोड पाटील (वय-28) रा. बिडगाव ता.चोपडा याला मुद्देमालासह अटक केली.
4. जळगाव शहरात व जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून रामानंद नगर पोलीसांनी आरोपी सोनुसिंग बावरी याला अटक करत त्याच्या घराची झडाझडती घेतली असता घरातून 227 ग्रॅम 880 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे व 160 ग्रॅम 920 मिलीग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे एकुण 7 लाख 40 हजार 598 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
5. जळगाव शहरात ठिकठिकाणी शहरात घरफोडी प्रकरणी मध्यप्रदेशातून राजेंद्र उर्फ सोपराजा दत्तात्रय गुरव (वय-30) रा. वाघनगर तर अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील वय 25 रा नांद्रा जि.जळगाव यांना दोघांना अटक केली. त्यांनी घरफोडीची कबुली दिली.