जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या काळातील अविरत सेवेनंतर आपल्याला कोरोनाची लागण झाली असली तरी लवकरच आपण पुन्हा एकदा आरोग्य सेवेत रूजू होणार असल्याची माहिती आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक तथा आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी दिली आहे.
माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी तथा आरोग्यदूत अरविंद देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. आधी त्यांचे पुत्र साहिल पॉझिटीव्ह झाल्यानंतर ते स्वत: बाधीत झाले आहेत. या संदर्भात माहिती देतांना देशमुख यांनी सोशल मीडियातील पोस्टच्या माध्यमातून सविस्तर विवेचन केले आहे.
या पोस्टमध्ये अरविंद देशमुख यांनी म्हटले आहे की-
मी म्हटलो होतो; धोका अजून टळलेला नाही…
माझा Rt-Pcr रिपोर्ट पॉझिटिव्ह आला…
कोविड 19च्या वैश्विक महामारी ने संपूर्ण जग भयभीत झालेले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या पाठबळाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये करोनाची भीती न बाळगता मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालयात खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांच्या संपर्काला जाणे. त्यांची विचारपूस करणे डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे यासारखे अनेक दैनंदिन कामे त्या कठीण काळात केली.
जिल्ह्यात कोविडचे रुद्र रूप धारण केलेले असताना गिरीशभाऊंच्या आदेशाने जीएम फाउंडेशन कोविड 19 केअर सेंटर सुरू केले. रुग्णांची गैरसोय होऊ नाही म्हणून सेंटर सुरू झाल्या दिवसापासून सेंटर बंद होईपर्यंत कोविड सेंटर मध्येच मुक्कामाला राहिलो. सेंटरची टॅगलाईन होती, ”काळजी घेणारी माणस” आणि ती टॅगलाईन आम्ही खऱ्या अर्थाने लोकांच्या सेवेच्या माध्यमातून खरी करून दाखवली. दरम्यानच्या काळात अनेक समविचारी राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध पक्षातले कार्यकर्ते नेते यांच्या कामात आम्ही येऊ शकलो हे काम करत असताना आम्ही मात्र कधीच हा आमच्या पार्टीचा आहे की दुसर्या पार्टीचा आहे असा विचार कधी केलाच नाही खरंतर गिरीश भाऊ ची शिकवणंच अशी आहे.
रुग्णसेवेचे काम करत असताना जात पात धर्म पार्टी पक्ष न पाहता काम करीत जावे आणि त्याच भावनेतून माझ्या सह माझ्या सर्व टिमने कामे केली जिल्ह्यात कोविडने विदारक चित्र निर्माण केलेले असताना PPE किट सानीटायझर हॅन्ड ग्लोज यासारख्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या साधनांची त्यांच्या गावापर्यंत जाऊन आर एच असेल ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपजिल्हा रुग्णालय असेल तेथपर्यंत जाऊन त्यांना सुपूर्द केले. यात हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव धुळे अमळनेर पाचोरा भडगाव पारोळा चाळीसगाव जवळगाव सर्व तालुक्यामध्ये गिरीषभाऊच्या माध्यमातून मी व्यक्तिगत संपर्क करून सर्वांपर्यंत पोहोचलो होतो हे सर्व करीत असताना अगोदर सर्वात स्वतःची काळजी घेतली. आणि त्यामुळे कोविडचा कहर संपेपर्यंत मी निगेटिव्ह राहिलो.
अतिशय काळजीपूर्वक कुठे स्पर्श होणार नाही मास कंटिन्यू राहील वेळोवेळी sanitizer चा वापर या सर्व गोष्टी करत गेलो. आणि या ईश्वरी कार्याला खंड नको म्हणून देवाने सुद्धा पूर्ण पाठबळ देऊन कुठेही व्यत्यय येऊ दिला नाही. माझ्यासह घरातील कोणीही त्या काळात पॉझिटिव्ह आलेला नाही. आणि आता कोविडचा परतीचा काळ सुरू असताना घरातल्या घरात ”नजर हटी दुर्घटना घटी” असं झालं. आणि आमचे बाळराजे साहिल देशमुख यांच्या नंतर मी पण पॉझिटिव आलो. साहिल Rapid टेस्ट पॉझिटिव्ह व माझी निगेटिव्ह आली होती मात्र शंका असल्या कारणाने मी rt-pcr केला. त्याआधी H.R CT.केलं त्यात रिपोर्ट चांगला निघाला. मात्र काल रात्री उशिरा rt-pcr रिपोर्ट हा पॉझिटिव असल्याची बातमी कळाली
माझी काळजी करण्याचं काही कारण नाही माझी व साहीलची प्रकृती अतिशय ठणठणीत आहेत डॉक्टरांच्या मार्गदर्शन पण घेतलेला आहे योग्य ते औषध उपचार सुरू शिवाय H.R.ct स्कोर मात्र 0 आहे. लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत नव्या जोमाने कामाला लागू मात्र या सर्व गोष्टी करत असताना एका गोष्टीची खंत मात्र वाटेल कोविडचे भयानक भीतीच्या वातावरणात आम्ही जीवाची पर्वा न करता काम केले मात्र vaccination करता शासनाने*आमचा कुठलाही विचार केला नाही याची खंत मात्र कायम राहील…..!
जय श्रीराम
सदैव आपलाच
अरविंद देशमुख