Home क्राईम बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास

बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास


chain snatcher01

जळगाव प्रतिनिधी । येथील नवीन बसस्थानकातून जिल्हा न्यायालयात कार्यरत शिपायाचा मोबाईल लांबविण्याची घटना ताजी असतांनाच दुसर्‍याच दिवशी बसमध्ये चढतांना महिलेचे पाच ग्रॅमचे मंगळसूत्र तोडून नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान महिलेने आरडाओरड करून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता भामटा पसार झाला.

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सोनाली ज्ञानेश भंगाळे ही विवाहिता आई सोबत सावदा येथे आली होती. नंतर सासरी निंभोरा (रावेर) येथे जाण्यासाठी आज दोघी जण जळगाव नवीन बसस्थानकावर आल्या. याठिकाणी रावेर बसची प्रतिक्षेत होत्या. बस लागल्यानंतर मायलेक दरवाजातून चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटा सोनाली भंगाळे यांच्या गळ्यातील मंगलपोतमधील पाच ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र तोडून पसार झाला. त्यांनी आरडाओरड करत संशयीताचा पाठलाग केला, परंतु कोणाला काही कळण्यापूर्वीच संशयीत गर्दीतून पसार झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात कुठलीही तक्रार दाखल नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound