नवी दिल्ली वृत्तसंस्था । सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पुन्हा पद न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमिवर, काँग्रेस वर्कींग कमिटीची शनिवारी मॅरेथॉन बैठक झाली. यात सर्वांनी राहूल गांधी यांना राजीनामा न देण्याची विनंती केली. मात्र ते आपल्या पवित्र्यावर ठाम होते. अखेर यामुळे सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत राहूल गांधी यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानत त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.