आदर्श शिक्षक सोमा कोल्हे यांचे निधन

soma kolhe

 

फैजपूर प्रतिनिधी । येथील विद्यानगरातील रहिवासी सोमा डुबा कोल्हे (वय-८२) यांचे आज (दि.15) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमा कोल्हे हे आदर्श शिक्षक म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते.

सोमा कोल्हे हे आदर्श शिक्षक म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते. सेवानिवृत्तीनंतर यावल तालुक्याचे ज्येष्ठ नागरिक संघ तसेच निवृत्त सेवासंघाचे अध्यक्ष म्हणून पद सांभाळले. जिल्ह्यासह राज्यभर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी कार्य केल्याने दिल्ली येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या पुढाकाराने फैजपूर येथे जेष्ठ नागरिकांसाठी सभामंडपाची उभारणी करण्यात आली. कोल्हे हे मूळचे बामणोद येथील रहिवासी असून तेथील प्रागतिक शिक्षण मंडळाच्या विविध पदांवर निवडून आले होते. ते भालोद येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कोल्हे व जिल्हा परिषद शिक्षक विजय कोल्हे यांचे वडील तर दीपनगर येथील ज्युनिअर इंजिनीअर जयेश कोल्हे यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content