यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली मधुकर पारधी, रमेश साळुंके, मगन पारधी, राहुल शेले मंगेश माळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांच्या शिष्ठ मंडळाने विविध मागण्या संदर्भात प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी शिष्ठ मंडळाला पारधी समाज बांधवांनी केलेल्या शबरी घरकुल योजनांचा आधिका अधिक लाभ मिळावा, स्वाभिमान शबरी योजनेअंतर्गत दोन एकर बागायीत व चार एकर कोरडवाहू जमीन मिळावी यासह आदिवासी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासह विविध मागण्यांना प्राधान्याने लक्ष केन्द्रीत करुन प्रशासनाच्या माध्यमातुन प्रश्न सोडविण्याचे सर्वतोपरीने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी शिष्ठ मंडळास सांगीतले .