रावेर प्रतिनिधी । दिव्यांग बांधवांना सन्मानाने त्यांच्या समस्या मार्गी लावा अश्या सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी रावेर पुरवठा निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
रावेर पुरवठा निरिक्षक अतुल नागरगोजे यांच्याकडून दिव्यांग बांधवांना नेहमी अपमास्पद वागणूक देऊन फिरवले जात असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी पुरवठा निरक्षकांच्या कुलुप बंद कार्यालयाला हार टाकून गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले होते. येथील पुरवठा निरिक्षक दिव्यांग बांधवांची फिरवा-फिरव करतात त्यांना रेशन कार्ड देण्यासाठी अडवणुक करतात यामुळे तालुभरातील दिव्यांग बांधवांची भटकंती होत असून अपमास्पद बोलत असल्याचा आरोप उपस्थित दिव्यांग बांधनी केला होता. या प्रकरणाची दखल जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी घेतली आहे.