मुंबई वृत्तसंस्था । अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना नऊ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. एनसीबीकडून त्यांची चौकशी करण्यात येईल.
“एनसीबीने अटकेची कारवाई केली. त्यातून मुंबई पोलीस मोठं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, ही कुटुंबीयांना वाटणारी भीती बरोबर होती, हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात वेगवेगळे अँगल आहेत. वेगवेगळया अंगाने तपास होऊन, आणखी माहिती समोर येईल अशी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांना अपेक्षा आहे” असे विकास सिंह म्हणाले.