मुंबई प्रतिनिधी । या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण येत्या दि. 26 डिसेंबर रोजी लागणार आहे. भारतात सूर्योदयानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण देशातील दक्षिण भाग कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये दिसेल. तर देशातील इतर भागात हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहणाच्या रुपात दिसेल, असे खगोल शास्त्रज्ञांनी सांगितले.
भारतीय वेळेनुसार खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी 8 वाजता दिसेल. तर कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळी 9.06 वाजता दिसेल. सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी संपेल. तर ग्रहणाची खंडग्रास अवस्था दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी संपेल. या सूर्यग्रहणामध्ये सुर्याचा 93 टक्के भाग हा चंद्राने झाकला जाईल. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र आल्यामुळे सुर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही याला सूर्यग्रहण म्हणतात. दरम्यान, यानंतर सूर्यग्रहण भारतात 21 जून 2020 दिसेल. ते एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. कंकणाकृती अवस्थेचे सूर्यग्रहण भारतातून जाईल. तर देशाच्या शेष भागात हे सूर्यग्रहण खंडग्रास रुपात दिसेल.