छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त चाळीसगावात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

46c46308 e088 480d 8ea4 eb302016e7de

चाळीसगाव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाज्वल्य असा आहे, त्यांनी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रयतेचे राज्य अबाधित ठेवून गोरगरिबांना न्याय दिला. त्यांचा खरा इतिहास एका मराठी वृत्त वाहिनीच्या मालिकेतून जगासमोर आला आहे. अशा महान राजाची जयंती रयत सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज (दि.१४) साजरी करून समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार केला.  येथील पवारवाडीस्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा कार्यक्रम झाला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनावर गायत्री रामेश्वर चौधरी हिने बहारदार पोवाडा सादर केला तर स्नेहल सापनर हिने गित गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच किसनराव जोर्वेकर ,चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, पत्रकार मंडळाचे अध्यक्ष आर.डी. चौधरी, सचिव एम.बी. पाटील, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, अरुण पाटील, पाणी फाऊंडेशनचे विजय कोळी, डॉ. विनोद कोतकर, डॉ चेतना कोतकर, पत्रकार अर्जुन परदेशी, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, सूर्यकांत कदम अदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी रयत सेनेच्या  माध्यमातून गणेश पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून नागद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे रयत सेनेच्या  माध्यमातून समाजसेवा घडत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समाजामध्ये पाण्याचे महत्व पटवून देऊन गावागावांमध्ये पाण्याची जनजागृती करून महत्त्व पटवून देणारे पाणी फाऊंडेशनचे विजय कोळी ,राहुल राठोड, सविता राजपूत, हेमंत मालपुरे ,भागवत बैरागी, आकांक्षा निकम,डॉ पंकज पाटील यांचा तर महिलांच्या विविध समस्यावर आरोग्य शिबिरे घेऊन उल्लेखनीय कार्य करणारे आई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद कोतकर, डॉक्टर चेतना कोतकर, शीघ्रकवी रमेश पोतदार, शालीग्राम निकम यांचा तसेच अटीतटीच्या क्षणी रक्तपुरवठा वेळेवर उपलब्ध करून देणारे येथील पंकज पाटील, दुष्काळ असताना स्वतःच्या शेतातील पाणी चितेगाव  ग्रामस्थांना देणारे भरत कवडे व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज धुरीणांचा  सन्मान चिन्ह देऊन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी संभाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पत्रकार बांधवांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी राहुल वाकलकर. विनायक मांडोळे, खुशाल पाटील, पप्पु पाटील, शिवाजी पवार, भाऊसाहेब पाटील, पंकज पाटील .सुरेश पवार .सतीश मुलमुले .दत्तू पवार. कुलदीप पाटील .विश्वास पवार. रामा पवार .रमेश पवार, जी.जी. वाघ, रवींद्र सरोदे, राजाराम पाटील, सुधीर शिंदे, विश्वास पवार, सुनिल पवार, अनिल कापसे, ज्ञानेश्वर पारधी, संतोष कापसे, रमेश पाटील, भैय्यासाहेब पाटील, दिनकर कडलग, निंबा जगताप, रूपेश पाटील, रयत सेनेचे पी.एन. पाटील, संतोष निकुंभ, ज्ञानेश्वर कोल्हे, संजय कापसे, दिपक राजपूत, सूर्यकांत कदम, योगेश पाटील, कुलदीप पाटील, रामा पवार, सुनील पाटील, विलास मराठे, गणेश देशमुख, राजूमामा पाटील, प्रदीप मराठे, विजय दुबे, सप्निल जाधव, मंगल पैलवान, प्रसाद पटाईत, अनिल मैराळे, सागर गागुर्डे, प्रवीण नागणे, बाळु पवार, स्वप्नील गायकवाड, चेतन पवार, मंगेश देठे, मयुर पवार, दत्तु पवार, सुनिल पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रयत सेनेचे सचिन नागमोती यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी मानले.

Add Comment

Protected Content