Home Cities जळगाव सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेत स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण

सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेत स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथे रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साही वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमास चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रतिभाचव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त जळगाव योगेश पाटील, विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी, मुख्याध्यापक सागर विशे व अधीक्षक लक्ष्मीकांत कोठावदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत संविधान मंचाचे उद्घाटन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संविधान मूल्ये, शिक्षण व सामाजिक समतेचे महत्त्व विशद करत मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले.

समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिस्त व परिश्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे तर चिकाटी, वाचनसंस्कृती आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली आवश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या विचारप्रवर्तक व साहित्यिक शैलीतील मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंजाबराव पाटील व दिपाली तडवी यांनी केले तर वनिता बेरड यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound