अमळनेर (प्रतिनिधी ) आपण समाजाचे देणे लागतो. आपल्याकडून जेवढी समाजसेवा होईल ती करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीले पाहिजे या वचनावर विश्वास असणारे देवळी हायस्कुलचे शिक्षक व पत्रकार ईश्वर महाजन यांनी वृद्ध व्यक्तीना घरातील चांगले कपडे भेट देऊन आपले सामाजिक भान जपल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शनिवार २५ मे रोजी अमळनेर येथील शनीमंदीराबाहेर एक वृद्ध व्यक्ती व महिला बसलेले होते. याच वेळी ईश्वर महाजन हे मंदिरात गेले असता त्यातील वृद्ध व्यक्तीने त्यांच्याकडे त्याच्या नातवांना व मुलाला कपडे देण्याची मागणी केली. या मागणीनंतर श्री. महाजन यांच्यातील दातृत्वाची भावना जागी झाली. यानंतर त्यांनी स्वतः चे घर गाठले. घरून त्यांनी त्यांच्या मुलांचे चांगल्यापैकी सात ड्रेस व स्वेटर, टोपी, बुट,मोठ्या माणसाला तिन ड्रेस ,नाईट पँन्ट आणत ते वृद्ध व्यक्ती व महिलेच्या स्वाधीन केले. कपडे मिळाल्यावर त्या वृद्ध व्यक्ती व महिला यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान उमटले. श्री. महाजन यांच्या सोबत मंगरूळ हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील उपस्थित होते.