अमळनेर (प्रतिनिधी) नोकरीत 30 ते 35 वर्षे सेवा केल्यास मनुष्य सेवानिवृत्त होतो. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी वाढते. म्हणून मनुष्य जीवनातून कधीच सेवानिवृत्त होत नाही. जोपर्यंत तो अस्तित्वात आहे. तोपर्यंत त्याच्याकडून सेवा घडतच असते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रा.आर.बी पवार यांनी केले. ते बजरंग पँलेस येथे संत गजानन महाराज यांच्या कार्यक्रमात सत्कार प्रसंगी बोलत होते.
आर.बी पवार पुढे म्हटले की, मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे सेवा दिलीय. नियमबाह्य कोणतेही काम केले नाही. विद्यार्थ्यांनची गुणवत्ता, शाळेचा विकास यावर लक्ष केद्रीत केले. आता सेवानिवृत्त झाल्यानंतर मित्र परिवारांनी केलेला सत्कार मला समाजकार्य करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. यावेळी देवगांव देवळी हायस्कुलचे माध्यमिक शिक्षक आय.आर.महाजन यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रा. आर.बी.पवार, ज्योती पवार यांचा शाल-सन्मानपत्र, बुके देऊन सत्कार केला. यावेळी माजी जि.प. सदस्य शांताराम पाटील, मारवड हायस्कुलचे मुख्याध्यापक एल.जे.चौधरी, सेवानिवृत्त लिपिक के.व्ही. पाटील, संजय पाटकरी, प्रमोद पवार, महेश पाटील, पत्रकार भुषण चौधरी, मोहीत पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.