जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज महानगर भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने शहरात सेवा दिवस साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथिल सेवालयातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले तसेच ’वसंत स्मृती’ भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालय येथे अवयव दान जनजागृती व अवयव दान या विषयावरती डॉ नरेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानंतर पदाधिकार्यांनी अवयव दानाचे फॉर्म भरून दिले त्यानंतर शहरातील ९ मंडळामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्षा सौ उज्वलाताई बेंडाळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, महेश जोशी, माजी उपमहापौर सुनील खडके, रेखाताई वर्मा, नगरसेवक वीरण खडके, विजय पाटील, महेश चौधरी, अतुल बारी, रेखाताई कुलकर्णी, चंदन महाजन, प्रकाश बालाणी, अक्षय चौधरी, प्रकाश पंडित, दीप्ती चिरमाडे, परेश जगताप, शक्ती महाजन, विजय वानखडे, भूपेंद्र कुलकर्णी, भूषण भोळे, मूविकोराज कोल्हे, राहुल पाटील, मिलिंद चौधरी, भाग्यश्री चौधरी, सहजता पाठक, नंदिनी दर्जी, चित्रा मालपाणी, संगीता पाटील, शालू ताई जाधव, अशपाक खाटीक, जावेद खाटीक, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.