मनपास्तरीय फुटबॉल स्पर्धा ; मुलांमध्ये नूतन तर मुलींंमध्ये एम. जे. विजयी

WhatsApp Image 2019 08 23 at 6.34.53 PM

जळगाव, प्रतिनिधी | उत्कृष्ट खेळाडू युगा व पवन जिल्हा क्रीडा संकुलावर मनपा स्तरीय १९ वर्षा आतील फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलांमध्ये नूतन कॉलेजने बाहेती कॉलेज चा २-० ने तर मुलींमध्ये एम. जे. कॉलेजने बेंडाळे कॉलेज चा ३-० ने पराभव करीत चषक पटकाविला.

 

उत्कृष्ट खेळाडू म्हणून एम. जे. ची युगा नवल व नुतनचा पवन सपकाळे यांनी बहुमान मिळविला. त्यांना स्पोर्ट्स हाऊसतर्फे आमिर शेख यांनी मेडल व विजयी ,उप विजयी संघास चषक देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत मुलांमध्ये बाहेतीने अँग्लो चा २-० व नूतन ने एम. जे. चा २-१ ने पराभव केला होता. पारितोषिक वितरणासाठी पुणे येथील जुडोच्या आंतरराष्ट्रीय स्वर्ण पदक विजेत्या रचना धोपेश्वर, मनपाचे उपआयुक्त उत्कर्ष बुटे, स्पोर्ट्स हाउसचे आमिर शेख, असोचे सचिव फारूक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन व प्रा. डॉ. अनिता कोल्हे उपस्थित होत्या. पंच म्हणून अ. मोहसीन, अजय वरचे, लियाकतअली सैयद यांनी काम पाहिले. प्रास्ताविक मनपाचे एम. एम. पाटील यांनी केले. आभार विवेक आळवणी यांनी मानले.

Protected Content