तर, दाऊदला फरफटत आणण्याची जबाबदारी केंद्राने पार पाडावी – खा. संजय राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) केलेल्या कारवाईत विशेष न्यायालयाने राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत मनी लॉण्ड्रींग सहभाग असल्याचे म्हटले आहे, यावरून दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणण्याची जबाबदारी अगोदर केंद्राने पार पाडावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी दिली.

कुर्ला येथील गोवाला कंपाऊंड ताब्यात घेणे, मनी लाँड्रिंग, गुन्हेगारी कटात राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांचा थेट आणि हेतुपुरस्सर सबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यांवरुन स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले आहे. मलिकसह डी-कंपनीच्या सदस्य हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मुनिरा प्लंबरची प्रमुख मालमत्ता हडप करण्याचा गुन्हेगारी कट रचला. विशेष न्यायाधीश राहुल एन रोकडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. शिवाय प्रथमदर्शनी पुरावे आहेत की आरोपी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट आणि जाणूनबुजून सहभागी आहेत, म्हणून त्यांना पीएमएलएच्या कलम ३ आणि कलम ४ अंतर्गत आरोपी केले जाते असेही कोर्टाने म्हटले आहे. याबाबत अमेरिकेने पाकिस्तानात जाऊन लादेनला मारले, तसेच दाऊदची गंचाडी पकडून भाजपाकृत केंद्र सरकारने मुंबईत आणला पाहिजे. तो मोठा गुन्हेगार असेल तर त्याला मोकळे का सोडावे. दाऊद जिवंत तरी आहे का? हे आधी केंद्राने स्पष्ट करावे. तुम्ही जगातील मोठे नेते म्हणवता तर दाऊदला पकडून घेऊन या, अशी टीका केंद्रावर करीत संजय राऊत म्हणाले.

Protected Content