Home राज्य …म्हणून महापालिका ‘बीग बिं’च्या बंगल्याची जागा घेणार ताब्यात

…म्हणून महापालिका ‘बीग बिं’च्या बंगल्याची जागा घेणार ताब्यात


Amitabh Bachchan Screen Gra 1539431172

मुंबई (वृत्तसंस्था) जुहू परिसरात जुहू चंदन चित्रपटगृहाकडून ते इर्ला उदंचन केंद्राकडे जाणा-या संत ज्ञानेश्वर मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका रस्त्याचे रुंदीकरण करणार आहे. या रुंदीकरणाच्या कामासाठी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या बंगल्याची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

 

 

उद्योजक सत्यमूर्ती यांच्या निवासस्थानाच्या आवारातील नऊ फूट जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या आवारातील जागा ताब्यात घेण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. सत्यमूर्ती निवासस्थानाच्या जागी पूर्वी बंगला होता. बंगल्याच्या पुर्णरविकासावेळी रस्त्यासाठी जागा सोडण्याची अट घालण्यात आली होती. ही इमारत जंक्शन परिसरात असल्याने रस्ता ६० फूट रुंद केल्यानंतरही अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील या बंगल्यांच्या आवारातील जागांची मागणी पालिकेने केली होती. त्यासाठी संबंधितांना नोटीस पाठविली. परंतु उद्योजक सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश न दिल्यामुळे सत्यमूर्ती रेसिडेन्स या सात मजली इमारतीची संरक्षक भिंत पाडून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिका राबवणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या “प्रतीक्षा” बंगल्याच्या आवारातील सहा फूट जागाही रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घ्यावी लागेल. यासाठी पालिकेने अमिताभ बच्चन यांनाही नोटीस पाठविली असल्याचे वृत्त आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound