अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यात सध्यास्थितीत ९८.९६% पाणीसाठा झालेला आहे.
सदर धरणात पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी बोरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बोरी नदी काठाच्या गावांना खबरदारी देण्यात आली असून आवश्यक त्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहे.