अबतक २९… जळगावात उमेदवारांची भाऊगर्दी !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असताना दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 37 उमेदवारांपैकी आठ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे आता जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत एकूण २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान २९ उमेदवार असल्यामुळे दोन ईव्हीएम मशीन लावण्यात येणार असल्याने निवडणूक प्रशासनाची डोकेदुखी ठरणार आहे. शिवायत मतमोजणीसाठी देखील एकाचवेळी केंद्रातील इव्हीएम मशीनद्वारे मतमोजणीसाठी मोठी अडचण होणार असल्याची शक्यता आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदार संघात उमेदवारांचे प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे. १९ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. २९ ऑक्टोबर अखेरीस एकूण ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. यामध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ८ जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तर उर्वरित २९ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

हे २९ उमेदवार आहेत निवडणूकीच्या रिंगणात ! (नावे- पक्ष व चिन्ह)
डॉ. अनुज कृष्णा पाटील (मनसे- रेल्वे इंजिन), जयश्री सुनील महाजन (शिवसेना उबाठा-मशाल), शैलजा राजेश सुरवाडे (बहुजन समाज पार्टी-हत्ती), सुरेश दामू भोळे (भाजपा-कमळ), ममता भिकारी तडवी उर्फ मुमताज, (विकास इंडिया पार्टी-ट्रंपेट), ललित कुमार रामकिशोर घोगले (वंचित-गॅस सिलेंडर), सुनंदा विलास संदानशिव (हिंदुस्तान जनता पार्टी-दूरदर्शन), अनिल पितांबर वाघ (अपक्ष-कुकर), अफसर अब्दुल हमीद (अपक्ष-बॅटरी टॉर्च), डॉ.अश्विन शांताराम सोनवणे (अपक्ष-काचेचा पेला), प्रा.डॉ.आशिष सुभाष बडगुजर (अपक्ष-टेबल), उज्वल सुरेश पाटील (अपक्ष-शिट्टी), कुलभूषण वीरभान पाटील (अपक्ष-कपाट), गोकुळ रमेश चव्हाण (अपक्ष-हॉकी व बॉल), ॲड. गोविंद जानकीराम तिवारी (अपक्ष-सफरचंद), जयश्री सुनील महाजन (अपक्ष-नरसाळे), प्रदीप शंकर आव्हाड (अपक्ष-ट्रक), प्रमोद बळीराम पाटील (अपक्ष-पेट्रोल पंप), मयूर चंद्रकांत कापसे (अपक्ष-), महेश लक्ष्मीनारायण वर्मा (अपक्ष-कॅल्क्युलेटर), विठ्ठल अशोक मोरे, (अपक्ष-एअरकंडिशन), विनोद दामू अढाळके (अपक्ष-ऑटोरिक्षा), शिवराम पाटील (अपक्ष-फलंदाज), अहमद हुसेन शेख (अपक्ष- रूमकुलर), शेख हुसेन शेख बलदार (अपक्ष-बॅट), सय्यद फारूक सय्यद गफार (अपक्ष-फुटबॉल खेळाडू), साळुंखे सागर भीमराव (अपक्ष-वाळूचे घड्याळ), सिताराम दिवाकर मोरे (अपक्ष-हिरा) आणि संग्रामसिंग सुरेश सूर्यवंशी पाटील (अपक्ष-स्पॅनर) असे एकूण २९ उमेदवार निवडणुकीतच्या रिंगणात उभे आहेत.

Protected Content