शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचे ज्येष्ठ नेते संजय गरूड यांचे चिरंजीव स्नेहदीप यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरूड यांचे चिरंजीव स्नेहदीप गरूड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
स्नेहदीप गरूड यांनी जामनेर तालुक्यात शालेय स्तरावर नमो चषक अंतर्गत त्यांनी विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.तसेच भारतीय जनता पक्षाचे विविध उपक्रमात सहभाग घेतला होता त्यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.