भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिचर्डे येथे वार्षिक स्नेहसंमेलन सायंकाळी 7.30 वा. बापूसाहेब सोनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आबासाहेब पाटील केंद्र प्रमुख हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व्यासपीठवरील मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, बालगीत, शैक्षणिक उपक्रमावरील गीते तसेच अंधश्रद्धा निर्मूलन यावर नाटिका घेण्यात आली. कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने भाग घेतला. विदयार्थी व विदयार्थीनी उत्साहाने सहभाग घेतला सदर कार्यक्रमविषयी सर्व गावकरी यांनी कौतुक केले.
स्नेहसंमेलनास गावातील ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक मंडळ, तरुण मित्र मंडळ, पालक वर्ग, ग्रामस्थ, महिला मंडळ बहुसंख्यने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.