जळगाव प्रतिनिधी । वेगवेगळ्या घटनेत सहा जणांना सर्पदंश झाला असून उपचारार्थ जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, निलेश संजय नाथ (वय-28) रा. नशिराबाद जळगाव, रमेश सरपट बारेला (वय 22) रा. बोखरण ता.जामनेर आणि सुनिता काशिनाथ पावरा (वय 32) रा. वराडा ता. धरणगाव, प्रविण दत्तू कोळी (वय 24), रा. जामनेर, ईश्वर सुकदेव माळी (वय 33) रा. साकळी ता. यावल आणि भिका संपत भोई (वय 55) रा. शेदुर्णी ता. जामनेर यांना वेगवेगळ्या घटनेत सापाने चावा घेतला आहे. तिघांना उपचारार्थ जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.