जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन घटनेत तिघांना सर्पदंश झाल्याची घटना आज सकाळी झाली असून तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रितेश प्रल्हाद पाटील (वय-23) रा. पिंप्री ता. धरणगाव, अंबर बाबुराव सावकारे (वय-36) रा.खेडी ता. जळगाव आणि लता मांगो पाटील (वय-41) रा. खंडवा ता. जामनेर यांन तिघांना वेगवेगळ्या घटनेत सापने चावा घेतला. तिघांना उपचारार्थ जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उचारार्थ दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृतीस्थिर आहे.