Home क्राईम कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून गुरांची तस्करी; पाचोरा पोलीसांनी उधळला डाव !

कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून गुरांची तस्करी; पाचोरा पोलीसांनी उधळला डाव !


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील देशमुखवाडी रोडवर छुप्या पद्धतीने चाललेली पशुतस्करी पाचोरा पोलिसांनी धाडसी कारवाई करत उघडकीस आणली आहे. एका ‘छोटा हत्ती’ वाहनात ताडपत्रीच्या आडून चार गोऱ्ह्यांची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी, १७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील एचडीएफसी बँकेसमोरील सार्वजनिक रस्त्यावरून एक छोटा हत्ती वाहन (क्र. MH-०४-८३८२) संशयास्पद रितीने जात होते. पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनाची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघड झाला.

वाहन चालक शेख अय्युब शेख युसुफ (वय ३५, रा. कुर्बान नगर, पाचोरा) याने वाहनाच्या आजूबाजूला ताडपत्री लावून आत ४ गोऱ्हे प्रमाणापेक्षा जास्त संख्येत कोंबले होते. या प्राण्यांचे पाय दोरीने घट्ट बांधलेले होते आणि त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. मुक्या प्राण्यांना असह्य वेदना होतील अशा पद्धतीने त्यांची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती.

या कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचे वाहन आणि २७ हजार रुपये किमतीचे ४ गोऱ्हे, असा एकूण १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपी शेख अय्युब याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound