Home Cities जळगाव भाजपने महिलांचा सन्मान केला : स्मिता वाघ ( व्हिडीओ )

भाजपने महिलांचा सन्मान केला : स्मिता वाघ ( व्हिडीओ )

0
29

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून भाजपने महिलांना सन्मान केल्याचे प्रतिपादन आमदार स्मिता वाघ यांनी केले. त्या शहरातील ब्राह्मण संघामध्ये भाजपच्या महिला आघाडीचा मेळाव्यात बोलत होत्या.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, आज शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात भाजपच्या महिला आघाडीचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांची उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थितांमध्ये महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, बेटी बचाओ-बेटी पढाओच्या समन्वयक डॉ. अस्मिता पाटील, अर्चना पाटील, मालती साळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील यांचा समावेश होता. दीप प्रज्वलनाने कार्यक्रम झाल्यानंतर प्रारंभी शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, आजच आमदार स्मिताताई वाघ यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

पहा : आमदार स्मिताताई वाघ नेमक्या काय म्हणाल्यात ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound