Home Cities जळगाव सर्वांच्या सहकार्याने विजय मिळवणारच-स्मिता वाघ यांना विश्‍वास ( व्हिडीओ )

सर्वांच्या सहकार्याने विजय मिळवणारच-स्मिता वाघ यांना विश्‍वास ( व्हिडीओ )

0
39

जळगाव प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला सर्वांचे सहकार्य मिळून विजयश्री मिळणार असल्याचा आत्मविश्‍वास भाजपच्या उमेदवारी आमदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला. त्या लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होत्या.

जळगाव मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आ. स्मिताताई वाघ यांचे नाव काळ मध्यरात्री जाहीर झाल्यानंतर आज त्यांच्याशी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी उमेदवारी मिळाल्याबद्दल पक्ष श्रेष्ठींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. आपण यापूर्वी २०१४ मध्येही उमेदवारी मागीतली होती मात्र तेव्हा ती मिळाली नव्हती, आता मात्र जनसेवेची संधी मिळाली आहे. आपण पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे आपणास पक्षातील सगळ्या नेत्यांचे व पदाधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल, तसेच मित्र पक्ष शिवसेनेचेही आपणास सहकार्य मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आपण बालपणापासून संघटनेत काम करीत असून प्रत्येकवेळी आपल्या मेहनतीने पक्षात पदे आणि उमेदवारी मिळवली आहे, त्यामुळे कुणावर अन्याय होण्याची शक्यता किंवा कुणी नाराज होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पहा : आमदार स्मिताताई वाघ नेमक्या काय म्हणाल्या ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound