नवी दिल्ली वृत्तसंस्था । येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर बांधले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांना हे आश्वासन दिले.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दि.9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना बहाल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल, असा निर्णय दिला तर मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.